वाघोली (प्रतिनिधी) : ज्येष्ठ नागरिकांची संघटन होऊन त्यांचे विविध प्रश्न मार्गी लागणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ञ बाळासाहेब सातव सर यांनी केले.
वाघोली तालुका हवेली येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिक संघ वाघोली व अनघा महिला विकास संस्था वाघोली यांच्या संयुक्त विद्यमाने शिरूर-हवेली विधानसभा आमदार अशोक पवार यांच्या उपस्थितीत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रम प्रसंगी बाळासाहेब सातव सर बोलत होते.
ज्येष्ठ नागरिकांच्या संघटना मुळे ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक प्रश्न सुटण्यास मदत होत आहे याकामी वाघोली मध्ये बाळासाहेब सातव व इतर अतिशय चांगले काम असल्याचे गौरवोद्गार शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी काढले.
याप्रसंगी हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हे कर, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सोन्याबापु चौधरी, हवेली तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य माणिकराव सातव पाटील, वाघोली ग्रामपंचायतीच्या सरपंच वसुंधरा उबाळे, माजी सरपंच शिवदास उबाळे, माजी उपसरपंच कैलास बापू सातव, माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रेय कटके, अनघा महिला विकास मंडळाच्या अध्यक्षा संगीता बाळासाहेब सातव, आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीयुत देशमुख सर, प्रकाश सातव, सौ कुटे यांनी केले उपस्थितांचे आभार अशोक सातव यांनी मानले.