भविष्यात भरघोस नफा कमावण्याची संधी (भाग-२)

गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळविण्यासाठी आर्थिक सल्लागार हा फार मह्त्तवाचा ठरतो. ज्याप्रमाणे आरोग्याच्या अडचणीत योग्य डॉक्टरची गरज असते, कायदेशीर बाबींसाठी वकीलाची गरज असते, वाहन चालवण्यासाठी प्रशिक्षित चालकांची गरज असते त्याचप्रमाणे योग्य आर्थिक नियोजनासाठी आर्थिक सल्लागाराची निश्चितच आवश्यकता आहे.

भविष्यात भरघोस नफा कमावण्याची संधी (भाग-१)

एप्रिल-मे मध्ये येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांनंतर येणारे सरकार व त्याच्या अर्थव्यवस्थेबाबतच्या धोरण आणि नियमांमुळे देशातील उद्योगधंद्यांमध्ये होणारे मोठे बदल भविष्यात मोठी आर्थिक संपत्ती निर्माण करणार आहेत. म्युच्युअल फंडामध्येच सामान्य गुंतवणूकदाराने का गुंतवणूक करावी हे आपण पुढे पाहू या.
संपत्ती निर्मितीसाठी म्युच्युअल फंड उत्कृष्ठ पर्याय- सामान्य गुंतवणूकदार मोठी संपत्ती निर्मिती इक्विटी म्युच्युअल फंडात करून उभी करू शकतात. या योजनांमध्ये आपल्या जोखिम घेण्याच्या क्षमतेनुसार पर्याय उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ – हायब्रीड फंड, डायव्हर्सिफाईड फंड, लार्ज कॅप फंड, मिड कॅप फंड, सेक्टर फंड इत्यादी. अशा योजनांपैकी योग्य योजनांची निवड करून जो गुंतवणूकदारा भविष्यातील उद्दीष्टांसाठी व खर्चांसाठी योग्य नियोजन करतो त्याच्यासाठी म्युच्युअल फंडातील योजना उत्कृष्ठ पर्याय ठरू शकतात.

बचतीसाठी म्युच्युअल फंड योजना – आपल्या उत्पन्नातून वाचवलेला प्रत्येक रुपया साठवण्यासाठी व पैसे लागतील तसे, लागतील तितकेच काढण्याची सुविधा, इन्कमटॅक्स नियमांनुसार अत्यंत कमी टॅक्स लागत असल्याने म्युच्युअल फंड योजनांचा पर्याय बँकेतील मुदत ठेव व सेव्हिंग खात्यापेक्षा उत्कृष्ठ परतावा देत आहेत.

करबचतीसाठीच्या उत्कृष्ट योजना – प्राप्तीकर भरणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी रुपये १,५०,००० पर्यंतची कर बचत करण्यासाठी म्युच्युअल फंडाच्या करबचत योजना (ईएलएसएस योजना) निश्चितच उत्तम पर्याय ठरत आहेत. करांचा भार कमी करतानाच इक्विटी योजनेमुळे संपत्ती वाढवण्यास म्युच्युअल फंड योजना गुंतवणूकदारास मदत करत आहेत.

पैशांचे योग्य नियोजन करण्यास म्युच्युअल फंडाच्या योजना निश्चित मदत करतात – आपल्या मेहनतीने जमा केलेल्या पैशांची योग्य काळजी, कमीत कमी कर, त्वरीत पैशांची सोय व इतर पर्यायांपेक्षा जास्तीचा परतावा म्युच्युअल फंडांच्या योजनांमधून घेता येतो. उदाहरणार्थ – लिक्विड फंड, ओव्हरनाईट फंड इत्यादी.

आपल्याकडे असणाऱ्या जादाच्या रकमेसाठी योग्य गुंतवणूक पर्याय – म्युच्युअल फंडांच्या विविध पर्यायांमध्ये आपल्याकडे असणाऱ्या नेमक्या कालावधीसाठी जादाची रक्कम जी गुंतवणुकदाराकडे उपलब्ध आहे त्याचा वापर गुंतवणुकासाठी करण्यास योग्य पर्याय ठरेल.

दैनंदिन उत्पन्नांसाठी म्युच्युअल फंड योजना – आपल्याकडे असणाऱ्या एकरकमी गुंतवणुकीमधून सातत्यपूर्ण उत्पन्नाच्या संधी निर्माण करण्यासाठी म्युच्युअल फंड योजनांचा वापर निश्चितच फायदेशीर ठरतो. उदाहरणार्थ – सिस्टिमॅटिक विथड्रॉल प्लॅन (एसडब्लूपी) याचा वापर गुंतवणूकदार नियमित उत्पन्नांसाठी करू शकतात.

प्रत्येक गुंतवणुकदाराकडे नेमके गुंतवणुकीचे योग्य पर्याय निवडावेत याचे ज्ञान असेलच असे नाही. अनेक वेळा समोर येणाऱ्या अनेक गुंतवणूक पर्यायांचे काय फायदे-तोटे आहेत याचे सखोल ज्ञान नसते. आपले मित्र व नातेवाईक जे सांगत असतात त्यावरच बहुतांशी गुंतवणूकदार गुंतवणुकीचा निर्णय घेत असतात. अशावेळी गुंतवणूकदाराचा चुकीचा निर्णय, चुकीचा पर्याय निवडणे भविष्यात मोठे नुकसानकारक ठरते.

याचसाठी आर्थिक सल्लागार हा फार मह्त्तवाचा ठरतो. ज्याप्रमाणे आरोग्याच्या अडचणीत योग्य डॉक्टरची गरज असते, कायदेशीर बाबींसाठी वकीलाची गरज असते, वाहन चालवण्यासाठी प्रशिक्षित चालकांची गरज असते त्याचप्रमाणे योग्य आर्थिक नियोजनासाठी आर्थिक सल्लागाराची निश्चितच आवश्यकता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.