ड्रोन हल्ल्यात ठार झालेले निरपराध नागरिकच होते ;अमेरिकेची कबुली

काबूल – अफगाणिस्तानमधील अमेरिकेच्या सैन्याची माघार सुरू असताना केलेल्या ड्रोन हल्ल्यात ठार झालेले 10 जण हे निरपराध नागरिकच होते, याची कबुली अमेरिकेने दिली आहे. अमेरिकेच्या ड्रोनने उडवून दिल्ल्या कारमध्ये एक मदत कार्यकर्ता आणि या कार्यकर्त्याचे 9 कुटुंबीय होते, असे अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने केलेल्या तपासात निष्पन्न झाले आहे.

मृतांमधील सर्वात लहान 2 वर्षाचे बालक होते, असेही या तपासात निष्पन्न झाले आहे. काबूल विमानतळावर झालेल्या भीषण बॉम्बस्फोटानंतर लगेचच हा ड्रोन हल्ला झाला होता.
विमानतळावरील बॉम्बस्फोटानंतर तशाच प्रकारचा आत्मघातकी बॉम्बस्फोट करण्यासाठी हे आत्मघातकी पथक जात होते, असे स्पष्टिकरण अमेरिकेच्यावतीने देण्यात आले होते.

अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने मदत कर्मचाऱ्याच्या कारचा आठ तास मागोवा घेतला होता, ही कार इस्लामिक स्टेट-खोरसान या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे, असा त्यांना असा विश्वास होता. असे यूएस सेंट्रल कमांडचे जनरल केनेथ मॅकेन्झी म्हणाले. मात्र प्रत्यक्षात मिळालेली माहिती चुकीची असल्यामुळे ड्रोनद्वारे ती उडवली गेली असेही मॅकेन्झी म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.