सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वाशिंबे येथील प्रा. रामदास झोळ या ध्येयवादी तरुणाने ग्रामीण भागात तंत्र व उच्च शिक्षण तसेच “केजी टू पीजी’ शिक्षण देणारी दत्तकला शिक्षण संस्था उभारून ग्रामीण भागातील युवकांसाठी दिवास्वप्न असणारे तंत्रशिक्षण प्रत्यक्षात आणण्याची किमया केली आहे. प्रा. झोळ यांनी दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे उभारलेल्या दत्तकला शिक्षण संस्थेमध्ये औषध निर्माणशास्र आणि अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये पदविका, पदवी व पदव्युत्तर शिक्षण, व्यवस्थापन, हॉटेल मॅनेजमेंट, आर्किटेक्चर, सीबीएसई स्कूल तसेच एसएससी स्कूल अशा अभ्यासक्रमात चार हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
शेतकरी कुटुंबातील प्रा. रामदास झोळ यांनी पुणे विद्यापीठात गणित विषयात एमएससी केल्यानंतर ते पुण्यातील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्राध्यापकपदी रुजू झाले. ग्रामीण भागातील तंत्रशिक्षणाची दयनीय अवस्था त्यांना अस्वस्थ करीत होती. सिंहगड संस्थेचे प्रमुख प्रा. एम. एन. नवले यांच्याशी चर्चा करून ग्रामीण भागामध्ये तंत्रशिक्षण देणारी शैक्षणिक संस्था उभी करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
प्रा. रामदास झोळ यांनी पत्नी माया झोळ यांच्या साथीने दत्तकला शिक्षण संस्थेची स्थापना वर्ष 2008 मध्ये भिगवण येथे भाडेतत्वावर जागा घेऊन 125 विद्यार्थ्यांसह केली. स्वत:ची वडिलोपार्जित शेती गहाण ठेवून दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील 30 एकर उजाड माळरान विकत घेतले. आता, या माळरानावर सरस्वती नांदते आहे. वाचाल तर वाचाल व शिकाल तर टीकाल… हे ब्रीदवाक्य ग्रामीण तरुणांच्या नसानसात भिणवण्याचे काम प्रा. झोळ करीत आहेत म्हणून दत्तकला शिक्षण संस्था ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम पर्याय म्हणून पुढे आली आहे. दौंड, इंदापूर, बारामती, कर्जत, करमाळा या तालुक्यातील व्यावसायिक आणि तंत्रशिक्षणाचा अनुशेष भरून काढण्याचे काम प्रा. झोळ यांच्या माध्यमातून होत आहे.
संस्थेचा शाखा विस्तार
1. दत्तकला इंटरनॅशनल स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज
2. दत्तकला इंटरनॅशनल स्कुल (सीबीएसई)
3. दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटशन्स, फॅकल्टी ऑफ इंजिनिअरिंग (डिप्लोमा, डिग्री, एमई)
4. दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटशन्स, फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट (एमबीए
5. दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्मसी,
बी. फार्मसी, एम. फार्मसी, फार्म. डी.)
6. इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल सायन्स अँड रिसर्च (मुलींसाठी-डी. फार्मसी, बी. फार्मसी)
7. अनुसया इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी (डी. फार्मसी)
8. दत्तकला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नोलॉजी (बीएचएमसीटी)
(वरील सर्व संस्था स्वामी चिंचोली (भिगवण), ता. दौंड, जि. पुणे)
9. दत्तकला आयडीयल स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज, केतूर न., ता. करमाळा, जि. सोलापूर
महाराष्ट्रातील फार्मसी अभ्यासक्रमाची सर्वात जास्त प्रवेश क्षमता असलेली ही एकमेव शिक्षण संस्था
दत्तकला शिक्षण संस्थेतील सोयीसुविधा
1. विद्यार्थ्यांसाठी सर्व दळणवळणाच्या सुविधा
2. प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र इमारत
3. विषयानुसार तज्ज्ञ प्राध्यापक
4. अतिशय सुसज्ज ग्रंथालय
5. बॉईज व गर्ल्स होस्टेल व कॅंटीन
6. कॉम्प्युटर लॅब
7. स्पर्धा परीक्षा विभाग
8. रोजगार निर्मितीसाठी प्लेसमेंट सेल
(संकलन : सुरेंद्र शिरसाट, भिगवण)