कांदा पुन्हा वधारला; आवकही वाढली

चाकण बाजारभाव ः बटाटा व हिरव्या मिरचीची प्रचंड आवक

महाळुंगे इंगळे -खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्डमध्ये कांदा, बटाटा, हिरवी मिरची व भुईमूग शेंगांची प्रचंड आवक झाली. कांद्याची भरपूर आवक होऊनही कांद्याचे भाव तेजीत राहिले. लसणाची आवक व भावातही घट झाली. हिरवी मिरची, टोमॅटो, कोबी, वांगी, भेंडीचे भाव स्थिर राहिले. फळभाज्याच्या बाजारात टोमॅटो, फ्लॉवर, वांगी, दोडका, कारली व दुधी भोपळ्याची भरपूर आवक झाली.

पालेभाज्याच्या बाजारात कोथिंबीर व शेपूची विक्रमी आवक, तर मेथी व पालक भाजीची आवक घटली. जनावरांच्या बाजारात जर्सी गायी, बैल, म्हैस व शेळ्या-मेंढ्याच्या संख्येत घट झाली. एकूण उलाढाल 5 कोटी 25 लाख रुपये झाली.

चाकण बाजारात कांद्याची एकूण 7,550 क्विंटल आवक झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 1,450 क्विंटलने वाढूनही कांद्याच्या भावात 1,000 रुपयांची उच्चांकी वाढ झाली. कांद्याचा कमाल भाव 3 हजार 500 रुपयांवरून 4 हजार 500 रुपयांवर पोहोचला.

तळेगाव बटाट्याची एकूण आवक 750 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 140 क्विंटलने वाढल्याने भावात 300 रुपयांची घट झाली. बटाट्याचा कमाल भाव 2 हजार 500 रुपयांवरून 2 हजार 200 रुपयांवर स्थिरावला. जळगाव भुईमूग शेंगांची एकूण आवक 8 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 3 क्विंटलने वाढल्याने भावात 700 रुपयांची घट झाली. या शेंगांचा कमाल भाव 7 हजार 200 रुपयांवरून 6 हजार 500 रुपयांवर स्थिरावला.
लसणाची एकूण आवक 4 क्विंटल झाली.

गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक 2 क्विंटलने घटूनही भावात 2 हजार रुपयांची घसरण झाली. लसणाचा कमाल भाव 16 हजार रुपयांवरून 14 हजार रुपयांवर स्थिरावला. चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक 590 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 215 क्‍विंटलने वाढल्याने भाव स्थिर राहिले. हिरव्या मिरचीला 2 हजार ते 3 हजार रुपये असा कमाल भाव मिळाला.

फळभाज्या – आवक डागांमध्ये व कंसात प्रतीक्विंटलसाठी भाव – 
टोमॅटो 1450 पेट्या (800 ते 1400), कोबी 445 पोती (400 ते 600), फ्लॉवर 412 पोती (500 ते 1000), वांगी 580 पोती (2000 ते 3000), भेंडी 460 पोती (3000 ते 4000), दोडका 351 पोती (2500 ते 3500), कारली 410 डाग (2000 ते 3000), दुधीभोपळा 254 पोती (500 ते 1500), काकडी 312 पोती (600 ते 1000), फरशी 248 पोती (1000 ते 2000), वालवड 416 पोती (3000 ते 6000), गवार 216 पोती (4000 ते 6000), ढोबळी मिरची 690 डाग (2000 ते 3000), चवळी 310 पोती (2000 ते 3000), वाटाणा 900 पोती (2500 ते 3500), शेवगा 60 पोती (8000 ते 10000), गाजर 310 पोती (2000 ते 3000)

आवक व बाजारभाव – 

कांदा
आवक7550 क्विंटल
क्रमांक 14500 रुपये
क्रमांक 23500 रुपये
क्रमांक 32000 रुपय

बटाटा
आवक750 क्विंटल
क्रमांक 12200 रुपये
क्रमांक 22000 रुपये
क्रमांक 31500 रुपये

 

Leave A Reply

Your email address will not be published.