जुन्या पेन्शनचा सरकारकडे आग्रह धरणार

आ. जगताप, कर्डिले यांचे आश्‍वासन : शिक्षकांचे विविध प्रश्‍नी निवेदन
चिचोंडी पाटील –
1 नोव्हेंबर 2005 पूर्वी शासनाच्या सेवेत असलेले. परंतु सन 2005 नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या माध्यमिक शाळा व तुकड्यांवरील काम करणाऱ्या शिक्षकांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आग्रह धरणार असल्याचे प्रतिपादन आमदार अरुण जगताप व आमदार शिवाजी कर्डिले यांनी केले.

जिल्ह्यातील जुनी पेन्शन योजना कृती समितीच्या वतीने आयोजित बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी बोलताना आ. कर्डिले यांनी सांगितले की, मुख्यमंत्री व वित्तमंत्री, शालेय शिक्षणमंत्री सर्वजण जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात सकारात्मक निर्णय घेतील. यासंदर्भात कृती समितीच्या शिष्टमंडळाची त्यांशी भेट घडून आणण्यासाठी प्रयत्न करू. यावेळी नगर जिल्हा जुनी पेन्शन योजना कृती समितीचे अपासाहेब शिंदे, प्राचार्य सुनील पंडित, महेंद्र हिंगे, सुनील दानवे, बाबासाहेब बोडखे, चंद्रकांत चौगुले व इतर शिक्षक प्रतिनिधी यांनी जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात सविस्तर माहिती दिली.

2005 पूर्वी शासनाच्या सेवेत असलेल्या व 2005 नंतर 100 टक्के अनुदानावर आलेल्या कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजनेची मागणी ही नैसर्गिक तत्त्वाला धरून असून, कर्मचाऱ्यांची मागणी ही रास्त आहे. 2005 पूर्वीच्या कर्मचाऱ्यांत फक्त शिक्षक आज एकमेव वर्ग योजनेपासून वंचित राहिलेला आहे. 2005 पूर्वी सेवेत असलेले शिक्षण सेवक, कृषिसेवक इतर क्षेत्रातील सर्वच कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू असताना 2005 पूर्वी सेवेत असलेल्या शिक्षक बंधू-भगिनीवर अन्याय होऊ न देता नाही असे आश्‍वासन आमदारांनी दिले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here