शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी

सोमाटणे  (वार्ताहर) -शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समितीच्या मावळ शाखेच्या वतीने मावळचे तहसीलदार आर. व्ही. चाटे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले असल्याची माहिती मावळ तालुका जुनी पेंशन हक्‍क संघटनचे अध्यक्ष प्रकाश सातपुते यांनी दिली.

यावेळी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सरचिटणीस राजेश राऊत, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष योगेश ठोसर, मावळ तालुका शिक्षक संघाचे सरचिटणीस दत्ता भालेराव, शिक्षक संघ संघटक नवनाथ आडकर, कुंडलिक शिंदे, मावळचे सोशल मीडिया प्रमुख विकास रासकर उपस्थित होते.

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. सर्व संवर्गातील कर्मचारी यांची सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी दूर करावी. कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सर्व भत्ते मिळावेत. शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद करावीत. व अन्य मागण्या संदर्भात निवेदन देण्यात आले. या मागण्या मान्य न झाल्यास 5 सप्टेंबर रोजी काळ्या फिती लावून शासनाचा निषेध केला जाणार आहे. तसेच 9 सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी एकदिवसीय लाक्षणि

Leave A Reply

Your email address will not be published.