भंडारदरा धरणाच्या पाणलोटात संततधार

धरण 15 ऑगस्ट पूर्वी भरणार : इतरही धरणांच्या पाणलोटात पावसाचा जोर कायम

अकोले – भंडारदरा धरणाच्या पाणलोटात संततधार सुरू असून, हे धरण 15 ऑगस्ट पूर्वी भरणार हे निश्‍चित. असेच आशादायक चित्र प्रवरा खोऱ्याबरोबरच मुळा, आढळा व म्हाळुंगी या खोऱ्यांत आहे. ही धरणे मागेपुढे भरतीलच, असे चित्र या पावसाने निर्माण केले आहे.
आज सकाळी भंडारदरा धरणाने सात टीएमसीचा, तर निळवंडे धरणाने अडीच टीएमसीचा, मुळा धरणाने साडेदहा टीएमसीचा व आढळा धरणाने पाव टीएमसीचा टप्पा गाठला. भोजापूर धरणामध्ये आणि जायकवाडी धरणांमध्ये बऱ्यापैकी आवक सुरू झाली आहे. जायकवाडी धरणामध्ये 19.834 टीएमसी पाणीसाठा झाला असून, भोजापूर धरणामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

भंडारदरा धरणात आज सकाळी 7090 दशलक्ष घनफूट पाणी साठा झालेला होता. या धरणातील आतापर्यंतची आवक पाहता आणि सध्या पडणाऱ्या पावसाची परिस्थिती पाहता हे धरण येत्या पंधरा ऑगस्टपूर्वी निश्‍चित भरणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. या धरणाची साठवण क्षमता 11 हजार 39 दशलक्ष घनफूट इतकी आहे.

त्याखाली असणारे निळवंडे धरणही संथ गतीने साठ्याच्या दृष्टीने वाटचाल करत आहे. या धरणात आज सकाळी 2593 दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली. अडीच टीएमसी पाणीसाठा झाल्याने आणि कृष्णावंती नदीचा विसर्ग या धरणामध्ये येऊन मिळत असल्याने हे धरणही निश्‍चित भरेल.
अकोले तालुक्‍यामध्ये हरिश्‍चंद्रगड, पाचनई या परिसरातील कोसळणारा पाऊस मुळा नदीच्या पात्रामध्ये पूर आणण्यासाठी पुरेसा ठरला आहे. या नदीच्या पात्रातून सध्या 14 हजार 321 इतका विसर्ग वाहतो आहे. त्यामुळे मुळा नदीला पूर आला आहे. या नदीवरील पिंपळगाव खांड धरण यापूर्वीच भरले आहे.त्यामुळे हे सर्वच पाणी मुळा नदीपात्रातून वाहत जाऊन मुळा धरणाला मिळते आहे.

आज सकाळी या धरणामध्ये 10 हजार 570 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा झाला होता. 1060 दशलक्ष घनफूट पाणीसाठा राहिलेल्या आढळा धरणामध्ये आज सकाळी 322 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा झाला होता, तर 363 दशलक्ष घनफूट साठवण क्षमतेच्या भोजापूर धरणातील पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. या धरणातही आज सकाळी 192 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा झालेला आहे.

तालुक्‍यामध्ये सर्व दूर पाऊस पडत असला, तरीही पश्‍चिम भागातील पाऊस हा जोराचा आहे, तर तुलनेने पूर्व भागातील पावसाची हजेरी अत्यल्प आहे.घाटघर व रतनवाडी येथे साडेचार, पांजरे व भंडारदरा येथे 4 इंच पाऊस झाला. गेल्या चोवीस तासांमध्ये पावसाची झालेली नोंद मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे : घाटघर-111, रतनवाडी-113, पांजरे-109, वाकी-95, भंडारदरा-105, निळवंडे-44, आढळा-15, अकोले 06, कोतूळ-25. सायंकाळी धरणे भंडारदरा 7364 दलघफू, निळवंडे 2861 दलघफू, मुळा 10968 दलघफू, मुळा नदी विसर्ग 16750 क्‍युसेक.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)