मुंबई – रेमो डिसोझा यांच्या ‘एबीसीडी’ आणि ‘एबीसीडी 2’ या चित्रपटांना मिळालेल्या मोठ्या यशानंतर आता ‘स्ट्रीट डान्सर 3’ हा चित्रपट लवकर प्रदर्शित होणार आहे. प्रभुदेवा, वरून धवन आणि श्रद्धा कपूर अशी दमदार स्टारकास्ट या चित्रपटात दिसून येणार आहे.
दरम्यान, नुकतंच ‘स्ट्रीट डान्सर 3’ या चित्रपटाचा ऑफिशल ट्रेलर प्रदर्शित करण्यात असून, ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. काही तासांतच सोशल मीडियावर चित्रपटाच्या ट्रेलरला जोरदार लाईक्स मिळाले आहेत.
अभिनेत्री नोरा फतेहीची देखील ट्रेलरमध्ये झलक पाहायला मिळत आहे. स्ट्रीट डान्सर 3 चित्रपट प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं 24 जानेवारी 2020 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.