श्रीलंकेतील स्फोटातल्या बळींची संख्या 359 वर

देशभर सूत्रधारांच्या शोधासाठी शोधमोहिम सुरू; 60 जणांना अटक

कोलोंबो – श्रीलंकेत रविवारी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये मरण पावलेल्यांची संख्या आता 359 वर पोहोचली आहे तर बॉम्बस्फोटांमध्ये 500 पेक्षा जास्तजण जखमी झाले आहेत. या भीषण बॉम्बस्फोटांमागील सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी देशभर शोधमोहिम सुरू आहे. आतापर्यंत 60 जणांन अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांचे प्रवक्‍ते रुवान गुनसेकेरा यांनी दिली.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर बॉम्बस्फोट घडण्यामागे मोठ्या कारस्थानाचा भाग आहे आणि सुरक्षा व्यवस्थेमध्ये मोठी त्रुटी राहून गेल्याचे संरक्षण मंत्री रुवान विजेवर्देने यांनी पत्रकार परिषदेमध्ये मान्य केले. सरकारल या घातपातामुळे झालेल्या नुकसनीची जबाबदारी घ्यावीच लागणार आहे. अध्यक्ष मैत्रिपाला सिरीसेना यांनी सुरक्षा व्यवस्थेमध्ये मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही गुनसेकेरा यांनी सांगितले.

झहरान हाशिम हा सूत्रधार असण्याची शक्‍यता

श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांमागे कट्टरवादी धर्मगुरु झरहान हाशिम हा असण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. त्याच्या कट्टरवादी कारवयांबाबत पूर्वीही इशारे देण्यात आले होते. रविवारच्या हल्ल्यांची जबाबदारी इस्लामिक स्टेटने स्वीकारताना एक व्हिडीओदेखील प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये झहरान हाशिम ठळकपणे दिसतो आहे. या व्हिडीओमध्ये आठ जण दिसत आहेत. मात्र एकट्या झहरानवगळता अन्य सर्वांचे चेहरे बुरख्यांनी झाकलेले आहेत. झहरान हाशिम यानेच इसिसचा म्होरक्‍या अबु बक्र अल बगदादीच्या सहकार्याने श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले असण्याची शक्‍यता तपास संस्थांनी वर्तवली आहे. इस्लामिक स्टेटशी संबंधित “नॅशनल थवोहिथ जमाथ’ या गटाचे नेतृत्व झरहान करत आहे. त्याच गटाने हल्ले केल्याचा संशय आहे. श्रीलंकेच्या सरकारने झरहान हाशिमकडेच संशयित म्हणून अंगुलीनिर्देश केला आहे.

प्राथमिक तपासावरून ख्राईस्टचर्च येथील गोळीबाराच्या घटनेचा हल्लेखोरांवर मोठा परिणाम झाला होता. हे सर्व आत्मघातकी हल्लेखोर उच्चशिक्षित होते. एक हल्लेखोर विदेशात शिक्षण घेतलेला होता. त्याने इंग्लंडमध्ये पदवी मिळवली त्यानंतर ऑस्ट्रेलियातून त्याने पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले आणि नंतर पुन्हा श्रीलंकेत येऊन्ह तो स्थायिक झाला. एकूण 9 हल्लेखोरांनी हे बॉम्बस्फोट घडवले. त्यामध्ये एका महिलेचाही सहभाग होता. त्यापैकी आठ जणांची ओळख पटली आहे, असे गुनसेकरा यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.