वेल्ह्यातील बाधितांची संख्या अर्धशतका जवळ

पुन्हा चौघांना लागण; रूळ्यात दोघे बाधित तर ३२ जाणांचे स्वॅब तपासणीसाठी

वेल्हे (प्रतिनिधी)– अतिदुर्गम वेल्हे तालुक्याला करोनाने झपाटल्या सारखे रूग्णांच्या संख्येत वाढ होवू लागली आहे. गुरूवार (दि. १६) रोजी चौघांना लागण झाली आहे. मंगळवारी चौघांना लागण झाली होती. त्यांच्या संपर्कातील वांजळेतील २ तर निगडे मोसे मधील २ असे चौघांना करोनाची लागण झाल्याची माहीती वेल्हे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अंबादास देवकर म्हणाले.

बुधवार दि. १४ रोजी रूळे येथील दोन लहान सख्ख्या भावांना लागण झाली असल्याचा रात्री उशीरा पॉजिटिव्ह रिपोर्ट आला. निगडे मोसे व वांजळे मधील बाधितांच्या संपर्कातील संशयिताच्या ३२ जाणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. आतापर्यंत ४९ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील बाधितांची संख्या अर्धशतकाला एकच कमी आहे. यातील ३४ रूग्ण बरे झाले आहेत. सध्या १५ रूग्ण उपचार घेत आहेत. तालुक्याला पुणे शहर जवळ असल्याने कामानिमित्त पुण्याला येणाऱ्यांची संख्या निम्याच्यावर असल्याने रूग्ण वाढण्याची शक्यता जास्त आहे.

वेल्हेतील कोविड सेंटरही पुर्ण भरले असून रोज ३० संशयित रूग्ण कोविड सेंटरमध्ये दाखल होत आहे. कोविड सेंटरमध्ये ५० जणांची सोय असून कालच्या व आजच्या रूग्ण संख्या वाढीने ओहरफ्लो झाले आहे. वेंटीलेटरची सोय नसल्याने रूग्णांची बिकट परिस्थिती होण्याची शक्यता नाकरता येत नाही. शुक्रवारी आणखी काही जणांचे रिपोर्ट येणार आहेत. त्यांच्या संपर्कातील पुन्हा संशयित दाखल झाल्याने कोवीड सेंटरला जागा कमी पडेल.त्यामुळे प्रशासनासमोर एक मोठे आव्हान उभे आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.