‘या’ शहरात बाधितांपेक्षा बऱ्या होणाऱ्यांची संख्या अधिक

  • सलग पाचव्या दिवशी दिलासादायक स्थिती   
  • 633 नवे करोनाबाधित

पिंपरी – गेल्या सात महिन्यांपासून शहरात ठाण मांडून बसलेल्या करोनाचा आलेख सातत्याने वाढत असतानाच गेल्या पाच दिवसांपासून काहीशी दिलासादायक स्थिती दिसून येत आहे. सलग पाचव्या करोनाबाधितांचा आकडा हजाराच्या खाली गेला आहे. तसेच बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने वैद्यकीय यंत्रणेवरील ताण देखील कमी होताना दिसत आहे.
गुरुवारी सायंकाळी महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार गेल्या 24 तासांत शहरातील 633 रुग्णांना करोनाची लागण झाली तर 1236 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मृत्यूचा आकडाही गुरुवारी कमी झाला आहे. गुरुवारी शहरातील पाच व शहराबाहेरील परंतु शहरात उपचार घेणाऱ्या चार अशा एकूण नऊ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

गुरुवारी शहराबाहेरील एकाही संशयिताचा अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, परंतु शहरातील 633 जणांना लागण झाल्याने एकूण करोनाबाधितांचा आकडा 78714 इतका झाला आहे. तर 1236 रुग्णांना आज डिस्चार्ज दिल्याने आतापर्यंत करोनामुक्‍त झालेल्या रुग्णांची संख्या 71124 इतकी झाली आहे. तसेच आतापर्यंत शहरातील 1323 रुग्णांचा आणि शहराबाहेरील परंतु शहरात उपचार घेणाऱ्या 493 रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला आहे. तसेच गुरुवारी मृत्यू झालेले शहरातील सर्व रुग्ण हे 60 पेक्षा अधिक वयाचे होते.

गेल्या सात महिन्यांमध्ये आतापर्यंत महापालिकेने एकूण 3 लाख 28 हजार 428 संशयितांची करोना चाचणी केली आहे. त्यापैकी 2 लाख 48 हजार 493 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. गुरुवारी देखील 4077 संशयित चाचणीसाठी दाखल झाले होते. त्यापैकी 1221 अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.