पाकिस्तानातील रुग्णांची संख्या वाढली

इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये करोना बाधितांची संख्या 1,625 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 12 तासांमध्ये करोनाची लागण झाल्याची 52 आणखीन प्रकरणे उघड झाली आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

पंजाबमध्ये 593, सिंधमध्ये 508, खैबर पख्तुनवामध्ये 195, बलुचिस्तानमध्ये 144, गिलगीट बाल्टीस्तानमध्ये 128, इस्लामाबादमध्ये 51 आणि पाकिस्तान व्याप्त काश्‍मीरमध्ये 6 रुग्ण सापडले आहेत. सरकारने सर्व आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे थांबवली असल्याने आता स्थानिक प्रादुर्भावच होत असल्याचे आरोग्य सल्लागार डॉ. जाफर मिर्झा यांनी सांगितले.

मात्र पंतप्रधान इम्रान खान अजूनही देशामध्ये लॉकडाऊन करण्याच्या विरोधात आहेत. देशातील अंतर्गत वाहतूक थांबवल्याने आणि नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊ न दिल्यास करोनाचा संसर्ग आटोक्‍यात येईल, असे त्यांचे म्हणणे आहे. गरिबांना अन्नधान्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिले जाईल, असेही खान यांनी म्हटले आहे. पण पंजाबमध्ये अन्नधान्याचा तुटवडा आताच जाणवू लागला आहे. अफगाणिस्तान, इराण आणि भारताबरोबरच्या सीमा पाकिस्तानने आणखी 2 आठवडे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.