बीजिंग : जगभरात करोना विषाणूचा फैलाव ज्या चीनमधून झाला, तेथील रुग्णांची संख्या आता केवळ 1 इतकी उरली आहे. चीनमधील राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्यावतीने ही माहिती देण्यात आली. चीनमध्ये मरण पावलेल्यांची संख्या 4,633 इतकी कायम राहिली असून त्यात नव्याने भर पडलेली नाही. शुक्रवारपर्यंत करोनाची लागण झालेल्या चीनमधील रुग्णांची एकूण संख्या 82,875 इतकी होती. त्यापैकी 77,685 रुग्ण बरे झाले आहेत, असे राष्ट्रीय आरोग्य आयोगाने म्हटले आहे.
एका नवीन रुग्णाला करोनाची बाधा झाल्याचे शुक्रवारी उघड झाले आहे. त्याशिवाय करोनाची बाधा झाल्याचे अन्य कोणतेही नवीन उदाहरण मिळालेले नसल्याचेही आरोग्य आयोगाने म्हटले आहे. परदेशातून चीनमध्ये आलेल्या 1,671 जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 7 जणांची प्रकृती गंभीर आहे.
करोनाच्या प्रादुर्भावाचा केंद्रबिंदू असलेल्या हुबेई प्रांत आणि या प्रांताची राजधानी वुहान शहरामध्ये 4 एप्रिलपासून सलग 28 दिवसांमध्ये कोणीही नवीन रुग्ण आढळलेला नाही. हुबेई प्रांतातील आपत्कालिन आरोग्य सुविधा प्रथम श्रेणीवरून कमी करून द्वितीय श्रेणीवर आणण्यात आली आहे. करोना विषाणूच्या प्रादुर्भावाला नियंत्रणात आणण्यात आल्याचे हे निदर्शक आहे, असे हुबेईचे उप राज्यपाल यांग यान्यान यांनी सांगितले.
दरम्यान करोनाची लक्षणे आढळणारे 20 नवीन प्रकरणे आढळली आहेत. आतापर्यंत 989 प्रकरणे आढळली आहेत.