करोनाबाधित कर्मचारी संख्या 2 हजार पार

एसटी प्रशासनाची डोकेदुखी वाढली


1500 कर्मचारी करोनामुक्‍त झाल्याने काहीसा दिलासा

पुणे – अनलॉकमध्ये विविध आस्थापनांमध्ये अधिकाधिक कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यास सांगितले आहे. यामुळे आस्थापनांतील करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) करोनाबाधितांची संख्या सुमारे 2 हजारांच्या घरात पोहोचली असून, त्यापैकी सुमारे 1500 कर्मचारी करोनामुक्‍त झाले आहेत.

लॉकडाऊनमध्ये स्थगित केलेली एसटी सेवा जूनपासून पूर्ववत झाली. सप्टेंबरपासून पूर्ण आसन क्षमतेसह एसटी बस धावण्यास सुरुवात झाली. जिल्हांतर्गत सुरू झालेली एसटी वाहतूक आता आंतरराज्य वाहतुकीपर्यंत विस्तारत आहे. त्यामुळे एसटीचे सर्वच कर्मचारी कर्तव्यावर रुजू झाले आहेत. पर्यायाने त्यांचा अनेकांशी थेट संपर्क वाढला आहे.

एसटी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 16 ऑक्‍टोबरपर्यंत राज्यभरातील विभागांसह मध्यवर्ती कार्यालय, मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था आदीतील करोनाबाधित कर्मचाऱ्यांची संख्या 2 हजार 87 वर पोहोचली आहे. यामध्ये सर्वाधिक कर्मचारी ठाणे विभागातील आहेत. करोनामुक्‍त कर्मचाऱ्यांची संख्या 1 हजार 591 आहे. तर सध्या 427 जणांवर उपचार असून, 69 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.