पिरंगुट -मुळशी तालुक्यात दिवसेंदिवस करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत मुळशीत करोनाबाधितांचा आकडा 64 झाला आहे. काल एका दिवसात तालुक्यात विविध ठिकाणी नऊ करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर आज दुपारपर्यंत आणखी सहा रुग्णांची भर पडल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अजित कारंजकर यांनी दिली.
लवळे येथे एक, पौड दोन, माणला एक, जांबे येथे एक तर कासारसाई येथे एकाला करोनाची बाधा झाली आहे. दरम्यान मुळशी तालुक्यात मंगळवारी (दि. 30) सूस येथे एक पुरुष, म्हाळुंगे येथे एक महिला, हिंजवडी येथे दोन पुरुष, जांबे येथे एक पुरुष, करमोळी येथे एक पुरुष, उरवडेत दोन पुरुष, तर भूगाव येथे एक पुरुष आदी नऊ बाधित सापडले. त्यामुळे तालुक्यात आज रुग्णांची संख्या छपन्न झाली असून बाधितांची वाढती संख्या चिंताजनक ठरणारी आहे.