अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येनंतर कंगना रनौत आणि रवीना टंडनसह यांच्यासह काही दिग्गज कलाकारांनी चित्रपटसृष्टीतील नेपोटिझमचा पर्दाफाश केला. या प्रकरणानंतर स्टार किडस्च्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सवर परिणाम झाला असून यामध्ये सुपरस्टार सलमान खानचे नाव सर्वात आघाडीवर आहे.
सलमान खानसोबतच चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर, अभिनेत्री आलिया भट्ट, सोनम कपूर आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या इंस्टाग्राम फॉलोअर्सची संख्या सातत्याने कमी होत चालली आहे. यात करण जोहरचे 330K इंस्टा फॉलोअर्स आतापर्यंत घटले आहेत. याशिवाय सोनम कपूरला 170K इंस्टा फॉलोअर्सचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, सुशांतसिंह राजपूतने 14 जून रोजी मुंबईत आपल्या घरी आत्महत्या केली होती. मीडिया रिपोर्टनुसार सुशांत 6 महिन्यांपासून नैराश्यात होता. सोशल मीडियावर त्याच्या नैराश आणि त्यानंतर केलेल्या आत्महत्येस बॉलीवूडमधील वंशवादाला जबाबदार धरले जात आहे. या कारणामुळेच सोशल मीडियावर या स्टार्स किडस्ना लक्ष केले जात आहे.