राजगुरूनगर – गेल्या दोन महिन्यांपासून डेंग्यूच्या रुग्णांमध्ये जवळपास निम्म्याने घट झाली असून, त्याच्या चाचण्यांची संख्याही कमी झाली आहे. पावसाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये घट होते.
तरीही ताप आदी लक्षणे आढळल्यास चाचणी करून घ्या आणि विनाविलंब उपचार घ्या असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. “इडिस इजिप्त’ डासांपासून डेंग्यू होतो. हा डास दिवसा चावतो.
डोकेदुखी, खूप ताप, पुरळ आणि सांधे आणि स्नायूंमध्ये वेदना असे या आजाराचे लक्षण आहे. याशिवाय थकवाही जाणवतो. डेंग्यू तापासाठी विविध प्लेटलेट मॉनिटरिंग करणे आवश्यक आहे.