मुझफ्फपूरमधील मेंदुज्वराच्या बळींची संख्या 83 वर

पाटणा/मुझफ्फपूर – मुझफ्फपूरमध्ये मेंदुज्वराने थैमान घातले असून रविवारी आणखी तीन बालकाचा मृत्यू झाला आहे. गेल्या महिनाभरात बळींची संख्या 83वर पोहोचली आहे. दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रत्येकी चार लाख रुपयांची कल्याण योजना जाहीर केली आहे. आतापर्यत श्रीकृष्ण मेडिकल कॉलेज आणि रुग्णलयात दाखल झालेल्या रुग्णांपैकी 69, तर केजरीवाल रुग्णालयातील 14 जणांचा मृत्यू झाला आहे.

मुझफ्फपूरमध्ये मेंदुज्वराने बळी गेलेल्यांमध्ये सर्वाधिक लहान मुलांचा समावेश आहे. या आजाराची लागण रोखण्यासाठी राज्य सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मात्र, तरीही यावर नियंत्रण मिळवणे अवघड झाले आहे. या बिकट परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मुझफ्फरपूरचा दौरा केला.

हर्षवर्धन यांनी सर्वाधिक मृत्यू झालेल्या आणि या आजाराची लागण झालेले रुग्ण दाखल असलेल्या येथील श्रीकृष्ण मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाला भेट देत डॉक्‍टरांशी चर्चा केली. यावेळी रुग्णालयाकडून रविवारी आणखी तीन मुलांचा मृत्यू झाल्याचे डॉ. हर्षवर्धन यांना सांगितले. तसेच राज्याचे आरोग्य मंत्री सुरेश शर्मा यांनीही आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहोत. मात्र, रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने खाटा आणि आयसीयू सेवाही कमी पडत असल्याचे म्हटले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×