नवी दिल्ली – देशातील बरे झालेल्या कोविड-19 रुग्णांची एकूण संख्या 27 लाखांपेक्षा अधिक झाली आहे.
गेल्या 24 तासांत 64 हजारांपेक्षा अधिक रुग्ण बरे झाले आहेत, देशातील रुग्ण बरे होण्याच्या दरात सुधारणा होऊन तो सध्या 76 टक्के झाला आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या सक्रिय रुग्णांपेक्षा 3.55 पटीने अधिक आहे.
देशभरात 19.5 लाख रुग्ण बरे झाले आहेत, सक्रिय रुग्णांपेक्षा ही संख्या अधिक आहे. सध्या एकूण पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 21 टक्के सक्रिय रुग्ण आहेत. वेळेत आणि रुग्णालय व्यवस्थापनामुळे गंभीर रुग्णांची सर्वांगीण देखभाल होत आहे, त्यामुळे मृत्यू दर सातत्याने कमी होत आहे, आज मृत्यूदर कमी होऊन तो 1.79 टक्के एवढा आहे.