जगभरातील करोनाबाधितांची संख्या 25 लाखांवर

फ्रान्स बनला 20 हजार मृतांची नोंद होणारा चौथा देश
पॅरिस : जगभरातील करोनाबाधितांच्या संख्येने मंगळवारी 25 लाखांचा टप्पा ओलांडला. त्या विषाणूने आतापर्यंत जगभरात 1 लाख 72 हजारांहून अधिक रूग्णांचा बळी घेतला आहे. दरम्यान, 20 हजार मृतांची नोंद होणारा फ्रान्स हा जगातील चौथा देश बनला आहे. करोनाने संपूर्ण जगापुढे प्रचंड आव्हान उभे केले आहे.

त्या विषाणूचा फैलाव 210 देशांत आणि प्रदेशांत झाला आहे. सर्वांधिक फटका जगातील सर्वांत शक्तिशाली देश मानल्या जाणाऱ्या अमेरिकेला बसला आहे. त्या देशातील करोनाबाधितांची संख्या जगाच्या जवळपास एक-तृतीयांश म्हणजे सुमारे 8 लाख इतकी आहे. अमेरिकेत करोनाने 42 हजारांपेक्षा अधिक रूग्ण दगावले आहेत. ते प्रमाण जगभरातील मृतांच्या संख्येपैकी जवळपास एक-चतुर्थांश इतके आहे. करोनाबळींच्या संख्येत इटली जगात दुसऱ्या स्थानी आहे. त्या देशात 24 हजार रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

स्पेनमध्ये 21 हजार तर ब्रिटनमध्ये 16 हजार बळींची नोंद झाली आहे. बेल्जियम आणि इराण या देशांनी मृतांच्या संख्येत 5 हजारचा टप्पा ओलांडला आहे. जर्मनीतील बळींचा आकडाही 5 हजार जवळ पोहचला आहे. खंडनिहाय विचार करता करोना फैलावाचा सर्वांधिक तडाखा युरोपला बसला आहे. त्या खंडात करोना संसर्गामुळे 1 लाखापेक्षा अधिक रूग्ण मृत्युमुखी पडले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.