जगभरातील करोनाबळींची संख्या 4 लाखांजवळ

अमेरिकेत सुमारे 20 लाख बाधित

पॅरिस -जगभरात हाहाकार उडवणाऱ्या करोना फैलावाचे संकट इतक्‍यात संपण्याची चिन्हे नाहीत. अशातच करोना संसर्गाने जगभरात घेतलेल्या बळींची संख्या 4 लाखांजवळ जाऊन ठेपली आहे.
जगातील 213 देश आणि प्रदेशांमध्ये करोनाचा फैलाव झाला आहे.

त्याचा सर्वांधिक फटका अमेरिकेला बसला आहे. जगभरात सुमारे 69 लाख करोनाबाधित आहेत. सर्वांधिक बाधित असलेल्या अमेरिकेतील आकडा 20 लाखांच्या घरात पोहचला आहे. त्या देशात करोनाने 1 लाख 11 हजारांपेक्षा अधिक बाधितांचा बळी घेतला आहे. ब्राझीलमध्ये जवळपास 6 लाख 50 हजार तर रशियात 4 लाख 59 हजार बाधित आढळले आहेत.

अमेरिकेपाठोपाठ ब्रिटनमध्ये 40 हजारांहून अधिक बाधित दगावले आहेत. ब्राझीलमध्ये 35 हजार तर इटलीत 33 हजारांहून अधिक मृतांची नोंद झाली आहे. फ्रान्समध्ये 29 हजार तर स्पेनमध्ये 27 हजार बाधित मृत्युमुखी पडले आहेत.

चीनमध्ये सर्वप्रथम मागील वर्षीच्या अखेरीस करोनाचा उद्रेक झाला. चीनने करोनाचा फैलाव रोखण्यात लक्षणीय यश मिळवले. मात्र, इतर अनेक देशांत त्या विषाणूने अक्षरश: कहर केला. चीनमध्ये 83 हजारांपेक्षा अधिक बाधितांची नोंद झाली आहे. मात्र, त्या देशाला इतर अनेक देशांनी करोनाबाधितांच्या संख्येत मागे टाकले आहे.

त्या संख्येच्या जागतिक क्रमवारीत चीन सध्या 18 व्या स्थानावर आहे. त्या देशाला मागे टाकून पाकिस्तान 17 व्या स्थानी पोहचला आहे. पाकिस्तानात सुमारे 94 हजार बाधित आहेत. चीनमधील मृतांची संख्या 4 हजार 634 आहे. तर पाकिस्तानात करोनाने सुमारे 2 हजार जणांचा बळी घेतला आहे. जगभरातील जवळपास निम्मे म्हणजे 34 लाख बाधित आतापर्यंत करोनामुक्त झाले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.