रांजणगाव गणपती : कारेगाव (ता. शिरुर) कोरोनाचा संसर्ग झालेले तीन रुग्ण आढळून आले असल्याचे पर्यवेक्षक आर.एम. नवले यांनी सांगितले.तर ढोकसांगवी ता. शिरुर येथे एकजण कोरोना संसर्ग झालेला रुग्ण आढळून आला असल्याचे रांजणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकारी डाँ.स्नेहल घोडेवार यांनी सांगितले.
रांजणगाव औद्योगिक वसाहती मधील विविध कंपन्यांचे हे कामगार आहेत. यातील कारेगाव येथे राहणारे तीन कामगार हे एका नामांकित कंपनीतील कामगार असून त्यांना ञास होऊ लागल्यामुळे त्यांनी खाजगी लँब मध्ये तपासणी केली असता त्यांचे अहवाल पाँझिटिव्ह आले असल्याचे कारेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे पर्यवेक्षक आर.एम. नवले यांनी सांगितले. तर ढोकसांगवी येथे सापडलेला रुग्ण हा कोरोना पाँझिटिव्ह असलेल्या व्यक्तीच्या संर्पकातील असल्याचे रांजणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकारी डाँ.स्नेहल घोडेवार यांनी सांगितले.
रांजणगाव औद्योगिक वसाहतीच्या परिसरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असल्यामुळे कामगार मंञी दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून प्रशासन योग्य खबरदारी घेत असून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर यांनी केले आहे.