मृतांची संख्या 1500 वर
बिजींग – चीन मध्ये करोना विषाणुची लागण झालेल्यांची संख्या आता तब्बल 65 हजार इतकी झाली आहे. या रोगाच्या प्रसारावर नियंत्रण मिळवल्याचा दावा चीन सरकारकडून केला जात असला तरी करोनाचा प्रसार रोखण्यात या सरकारला अपयश आल्याचे रोज जाहीर होणाऱ्या आकडेवारीवरून दिसत आहे.
काल या रोगाची 5090 लोकांना लागण झाल्याचे आढळून आले असून या रोगामुळे मरण पावलेल्यांची संख्या आता 1500 इतकी झाली आहे. करोनाच्या नियंत्रणासाठी काम करणाऱ्या आरोग्य आयोगाकडून सांगण्यात आले की या रोगामुळे काल गुरूवारी एका दिवसात 5090 नवीन केसेस आढळून आल्या आहेत. काल जे रूग्ण मरण पावले त्यातींल 116 रूग्ण एकट्या हुबेई प्रांतातील आहेत.