राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 59,546 वर पोहचली

मुंबई : राज्यात गुरुवारी कोरोनाच्या तब्बल 2598 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 59,546 वर गेली आहे. या पैकी सध्या राज्यात 38,939 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. दरम्यान, आज राज्यात 85 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 1982 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 698 कोरोनाबाधित रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा प्रमाण 31.26 टक्के आहे. राज्यातील मृत्यू दर 3.32 टक्के आहे.

गुरुवारी  झालेल्या 85 मृत्यूपैकी 37 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहे. तर उर्वरित मृत्यू हे 15 ते 25 मे या कालावधीत आहे. या कालावधीत झालेल्या 48 मृत्यूपैकी मुंबई 22, सोलापूर 5, अकोला 4, औरंगाबाद 3, सातारा 3, ठाणे 3, वसई विरार 3, जळगाव, नांदेड, नवी मुंबई, पुणे, रायगडमधील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 4 लाख 19 हजार 417 नमुन्यांपैकी 59,546 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 12 हजार 745 व्यक्ती होम क्वॉरंटाईन असून 35 हजार 122 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.

गुरुवारी  झालेल्या मृत्यूंपैकी 60 पुरुष तर 25 महिला आहेत. त्यातील 45 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 31 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. 9 रुग्ण 40 वर्षाखालील आहे. 105 रुग्णांपैकी 45 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अति जोखमीचे आजार आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.