नवी दिल्ली : भारतात कोरोनाबाधितांचा आकडा हा २३ हजार पार गेला आहे. आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या माहितीनुसार आज सकाळपर्यंत देशात कोरोना विषाणू बाधितांची संख्या ही २३ हजार ७७ वर पोहोचली. यापैकी १७ हजार ६१० रुग्ण हे कोरोना विषाणूच्या संसर्गावर उपचार घेत आहेत. तर ४ हजार ७४९ रुग्ण हे बरे झाले आहेत किंवा त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. तर आतापर्यंत ७१८ जणांनी आपले प्राण गमावले आहे.
India’s #COVID19 cases cross 23,000 mark – at 23,077. 17610 active cases, 4749 cured/discharged/migrated & 718 deaths: Union Health Ministry pic.twitter.com/AVTdjC8Q7y
— ANI (@ANI) April 24, 2020
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार २४ तासांत देशात १६८४ नवे रुग्ण समोर आले आहेत तर ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरातल्या आकडेवारीचा विचार करायचा झालाच तर गेल्या २४ तासांत जगभरात कोरोनामुळे ४ हजार ५०० लोकांनी आपला प्राण गमावला आहे, त्यामुळे शुक्रवार सकाळपर्यंत संपूर्ण जगात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ही १ लाख ८६ हजार ४६२ वर पोहोचली आहे. तर एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार जगात २४ तासांत ६८ हजार १७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
जगाचा विचार करता अमेरिकेत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ही देखील अधिक आहे. इथे कोरोनामुळे आतापर्यंत ५० हजारांहून अधिक जाणांनी आपला प्राण गमावला आहे.