पिंपरी -काही दिवसांपासून करोना बाधितांच्या संख्येत सतत चढ-उतार पाहायला मिळत आहे. गेल्या चोवीस तासांत 212 बाधित रुग्ण आढळले आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे.
गेल्या आठवड्यात शहरातील रुग्णालयांमध्ये 66 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू होते. मात्र या आठवड्यात रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची संख्या 9 वर आली आहे. तर, एक हजार 313 रुग्णांवर गृहविलगीकरणात उपचार केले जात आहेत.
आज दिवसभरात 821 संशयित रुग्णांची करोना चाचणी करण्यात आली. तर 199 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एकूण 3 लाख 66 हजार 391 बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 3 लाख 61 हजार 175 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 हजार 625 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. करोना बाधितांची संख्या सतत वाढत असून नागरिकांनी करोनाच्या त्रिसूत्रीचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.