नगर (प्रतिनिधी) – करोनाबाधित होणार्यांची संख्या आज पुन्हा थोडीसी वाढली आहे. कालच्यापेक्षा ती 322 ने अधिक असल्याची माहिती वैद्यकीय बुलेटीनमधून आज देण्यात आली. दरम्यान, जिल्ह्यात करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्याही आता लाखाच्या घरात पोचली आहे.
नगर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून रुग्णसंख्या घटतीकडे सुरु झाली होती. तथापि, आज पुन्हा थोडीसी वाढ झाल्याने पुन्हा चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. त्यातही एक दिलासादायक बातमी समोर आली असून, जिल्ह्यात पूर्णत: संपलेला ऑक्सिजनचा साठा पुन्हा गरजेपुरता मिळाला असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. त्यामुळे ऑक्सिजनची गरज असलेले रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी सुटकेचा श्वास टाकला आहे.
जिल्ह्यात आज 2 हजार 384 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 21 हजार 625 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 83.72 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्णसंख्येत 3 हजार 117 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्या रुग्णांची संख्या आता 21 हजार 989 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 420, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 1176 आणि अँटीजेन चाचणीत 1521 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 176, अकोले 03, जामखेड 48, कर्जत 03, कोपरगाव 01, नगर ग्रामीण 32, नेवासा 06, पारनेर 41, पाथर्डी 18, राहुरी 02, संगमनेर 03, शेवगाव 03, श्रीगोंदा 18, श्रीरामपूर 32, कँटोन्मेंट बोर्ड 08 आणि मिलिटरी हॉस्पिटल 26 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 604, अकोले 14, जामखेड 04, कर्जत 13, कोपरगाव 23, नगर ग्रामीण 91, नेवासा 15, पारनेर 42, पाथर्डी 23, राहाता 91, राहुरी 40, संगमनेर 99, शेवगाव 09, श्रीगोंदा 21, श्रीरामपूर 38, कँटोन्मेंट बोर्ड 17 आणि इतर जिल्हा जिल्हा 29 आणि इतर राज्य 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज 1521 जण बाधित आढळुन आले. मनपा 118, अकोले 116, जामखेड 57, कर्जत 153, कोपरगाव 52, नगर ग्रामीण 245, नेवासा 85, पारनेर 74, पाथर्डी 79, राहाता 158, राहुरी 94, संगमनेर 26, शेवगाव 41 श्रीगोंदा 47, श्रीरामपूर 155, कॅन्टोन्मेंट बोर्ड 15 आणि इतर जिल्हा 06 अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 490, अकोले 125, जामखेड 09, कर्जत 278, कोपरगाव 289, नगर ग्रामीण 85, नेवासा 46, पारनेर 116, पाथर्डी 177, राहाता 182, राहुरी 116, संगमनेर 135, शेवगाव 168, श्रीगोंदा 52, श्रीरामपूर 64, कॅन्टोन्मेंट 40, मिलिटरी हॉस्पिटल 01 आणि इतर जिल्हा 11 अशा रुग्णांचा समावेश आहे.