राज्यात करोनाग्रस्तांचा आकडा १०७८वर; मुंबई ठरतेय हॉटस्पॉट

मुंबई – राज्यात करोना व्हायरसने थैमान घालण्यास सुरुवात आहे. आज केवळ मुंबईत ४४ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यात एकूण करोनाग्रस्तांची संख्या १०७८ झाली आहे.

आकडेवारीनुसार, मुंबईत ४४, पुण्यात ९, नागपूरमध्ये ४, अहमदनगर, अकोला आणि बुलढाणामध्ये प्रत्येकी एक असे एकूण ६० नवे रुग्ण राज्यभरात आढळून आले आहेत.

मुंबई देशात सर्वांत मोठा कोरोना हॉटस्पॉट ठरत आहे. आज दुपारपर्यंतच्या आकडेवारीनुसार फक्त मुंबई परिसरातच ४४ नवे रुग्ण दाखल झाले. याशिवाय ५ रुग्णांचा मृत्यू मुंबईत झाला आहे. राज्याच्या एकूण आकड्यापैकी निम्म्याहून अधिक रुग्ण मुंबईतच आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.