मुंबई : राज्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गुरुवारी सकाळी पहिल्या टप्प्यात मुंबई आणि ठाण्यातून दोन नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने राज्याचा आकडा १२४ वर गेला आहे.
2 new positive cases of Coronavirus in Mumbai and Thane; Till now, the total number of positive cases in the state is 124: Health Department, Maharashtra pic.twitter.com/YirfRat6dP
— ANI (@ANI) March 26, 2020
कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून सर्वतोपरी कष्ट केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री बुधवारपासून देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. राज्य सरकारनेही यापूर्वीच उपाययोजना राबवण्यास सुरुवात केलेली आहे.
दरम्यान, बुधवारी एका दिवसात राज्यात १५ नवी प्रकरणे समोर आली होती. त्यात मुंबईतून ९, ठाण्यातून १ आणि सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमधील ५ रुग्णांचा समावेश होता.