नगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात आज करोनाचे 278 नवीन रुग्ण आढळून आले. त्यामुळे उपचार घेणारांची संख्या 1006 जाऊन पोेचली. 168 रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून, बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 73 हजार 111 पोचली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये 117, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 127 आणि अँटिजेन चाचणीत 34 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 35, अकोले 6, जामखेड 6, कर्जत 5, नगर ग्रामीण 9, पारनेर 8, पाथर्डी 2, राहाता 14, संगमनेर 20, श्रीरामपूर 10, मिलिटरी हॉस्पिटल 1, इतर जिल्हा 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 34, अकोले 2, कर्जत 3, कोपरगाव 6, नगर ग्रामीण 4, नेवासा 5, पारनेर 11, पाथर्डी 2, राहता 14, राहुरी 1, संगमनेर 33, श्रीगोंदा 5, श्रीरामपूर 4 आणि इतर जिल्हा 3 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटिजेन चाचणीत आज 34 जण बाधित आढळून आले. मनपा 5, जामखेड 13, कर्जत 3, नगर ग्रामीण 2,पारनेर 4, पाथर्डी 1, राहाता 3, राहुरी 2, श्रीगोंदा 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.