दिवसात नवे 311 करोनाबाधित : 493 डिस्चार्ज
पुणे – शहरात शुक्रवारी 311 नवे करोनाबाधित आढळले असून, 493 जण करोनामुक्त झाले. गेल्या अनेक दिवसांनंतर शहरातील सक्रिय रुग्णसंख्या साडेचार हजारांच्या खाली आली आहे.
शहरात सध्या 4 हजार 481 करोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 387 जणांची प्रकृती गंभीर आहे. 226 जणांना आयसीयूत व्हेंटिलेटरवर, तर 161 जणांना आयसीयूतील विनाव्हेंटिलेटर खाटांवर उपचार दिले जात आहेत. 857 जणांना ऑक्सिजन लावण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत शहरातील 5 आणि शहराबाहेरील 3 जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 4,597 जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे.
शहरात आतापर्यंतच्या एकूण करोनाबाधितांची संख्या 1 लाख 77 हजार 358 झाली असून, त्यापैकी 1 लाख 68 हजार 280 जण करोनावर मात करून घरी परतले आहेत. दिवसभरात महापालिकेचे विविध कोविड केअर सेंटर, खासगी रुग्णालये आणि प्रयोगशाळा आणि रॅपिड अँटिजेन किटद्वारे 3103 जणांच्या करोना चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत 8 लाख 99 हजार 005 करोना चाचण्या झाल्या.
1,68,280 : आतापर्यंतचे करोनामुक्त
1,77,358 : आतापर्यंतचे करोनाबाधित