पुणे – जळोची अंबिकानगर येथील कचरा डेपो दुसऱ्या ठिकाणी हलवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही किंवा अत्याधुनिक तंत्रज्ञान द्वारे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रत्यनशील राहू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. जळोची प्रभागातील अंबिका नगर येथील गणेश मंदिराच्या सभामंडप च्या लोकार्पण कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.
यावेळी स्थानिक नगरसेवक अतुल बालगुडे, उपनगराध्यक्ष अभिजित जाधव गटनेते सचिन सातव, महिला व बालकल्याण समिती च्या सभापती आशा माने, नगरसेवक अमर धुमाळ, नीलिमा मलगुंडे, युवती काँगेस च्या अध्यक्षा भाग्यश्री धायगुडे, राष्ट्रवादी चे अध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, संभाजी होळकर, मुख्यधिकारी महेश रोकडे व इतर अंबिका नगर चे रहिवासी उपस्तीत होते.
अंबिका नगर येथील नागरिकांनी लोक वर्गणीतून केलेले उल्लेखनीय व आदर्शवत कार्य असून नागरिकांनी वृषारोपन करून शासना मार्फत केलेल्या कार्याचे संरक्षण करावे योग्य सूचना असल्यास सांगाव्या व विकास कामासाठी सहकार्य करावे, असेही अजित पवार यांनी सांगितले.