शहरातील निरा सेंटर सुरूच

पिंपरी -करोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी राज्य शासनाकडून 14 एप्रिलपासून संचारबंदी व कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र, काही ठिकाणी नियमांना हारताळ फासला जात आहे. काही ठिकाणी किराणा व अन्य दुकाने सर्रास सुरू ठेवण्यात येत आहे तर, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खुलेआम चक्क निरा सेंटर सुरू असते.

यावर कारवाई का होत नाही किंवा निरा विक्रीस परवानगी दिली की काय असा प्रश्‍न ये-जा करणाऱ्या नागरिकांना पडत आहे. यामुळे करोना संक्रमणास एकप्रकारे आमंत्रण दिले जात आहे.

करोनाची दुसरी लाट आली आणि आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडला. यामध्ये अनेकांना वेळेवर बेड न मिळाल्याने आपला जीव गमवावा लागला आहे. तर, अजूनही परिस्थिती बदललेली नाही. यामध्ये शासनाने लावण्यात आलेल्या निर्बंधांना हरताळ फासत काही दुकानचालक आपली दुकाने सर्रास सुरू ठेवत आहेत.

यामुळे संचार बंदी आणि कडक निर्बंध लावण्यापाठीमागच्या मुख्य उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खुलेआम निरा विक्रीचे दुकान सुरू आहे. यावर कोणी कारवाई करत का नाही असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे.

अत्यावश्‍यक कारणासाठी घराबाहेर पडलेले नागरिक व सेवेतील कर्मचारी यांची ये-जा असते. यामुळे येथे अनेक नागरिक निरा पिण्यासाठी थांबतात. यामुळे करोना संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. याबाबत काही नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.