निळवंडे वसाहत परिसरात बिबट्या जेरबंद 

अकोले – आपली दहशत निर्माण करून परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. पण अजूनही तीन बिबट्यांच्या वावर असल्याने निळवंडे वसाहत परिसर दहशतीखाली आहे.

निळवंडे वसाहत हा परिसर प्रवरा नदी पात्राच्या लागत असून संपूर्ण परिसर हा ऊसशेती आणि जंगली गवताने वेढलेला आहे. या ठिकाणी विबट्यांना लपण्यासाठी जागा भरपूर आहे. शहरालगत असल्याने कुत्रे, मांजरे यांची ती शिकार करतात. परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी बिबट्यांच्या परिवाराचा वावर अनेक वेळेस पहिला आहे.

लोकांच्या मागणीनुसार 22 तारखेला सांयकाळी वनविभागाने या परिसरात पिंजरा लावला. त्यामध्ये कुत्रे ठेवले होते. कुत्र्याच्या आवाजाने शिकार करण्यासाठी आलेला बिबट्या अलगद वनविभागाच्या पिंजऱ्यात शिकार झाला. हा अडकलेला बिबट्या सहा वर्ष वयाचा असावा असा अंदाज वनविभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
बिबट्या पिंजऱ्यात अडकला आहे.

याची खबर वाऱ्यासारखी शहरात पोहचताच मोठ्या संख्येने बघ्यांची गर्दी होऊ लागल्याने वनविभागाने ताबडतोब बिबट्याची रवानगी संगमनेर येथील नर्सरीमध्ये केली आहे.अजून किमान तीन बिबट्यांच्या वावर इथे आहे. त्यामुळे हा परिसर अजूनही दहशतीखाली आहे. वन विभागाने त्यांचाही पिंजरे लावून बंदोबस्त करावा, अशी मागणी निळवंडे वसाहत परिसरातून होत आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.