आयुष्यमान भारत योजनेसाठी पुढील वर्षी जादा निधी देणार- पीयुष गोयल

नवी दिल्ली: आयुष्यमान भारत योजनेसाठी केंद्र सरकार पुढील आर्थिक वर्षात जादा निधी देईल अशी माहिती अर्थमंत्री पीयुष गोयल यांनी दिली. ते म्हणाले की गेल्या चार महिन्यात देशातील दहा लाख लोकांना या योजनेचा लाभ झाला आहे. आरोग्य विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

आयुष्यमान भारत योजनेसाठी आपण सादर केलेल्या अंतरीम अर्थसंकल्पात 6 हजार 400 कोटी रूपये मंजुर केले आहेत असे गोयल यांनी यावेळी सांगितले. देशातील गरीब आणि मध्यमवर्गातील सुमारे 50 कोटी लोकांपर्यत ही योजना पोहचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. विद्युतीकरणाच्या संबंधात माहिती देताना अर्थमंत्री म्हणाले की येत्या एप्रिल महिन्या पर्यंत देशातील प्रत्येक घरापर्यंत विज पोहचणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)