एसटी कर्मचाऱ्यांचा पुढचा मोर्चा शरद पवार यांच्या घरावर

नगर – एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी कर्मचाऱ्यांनी राज्यभर आंदोलनाची हाक दिली. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून वंचित बहुजन आघाडीवतीने आघाडीचे राज्य समन्वयक ऍड. डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये एसटी कर्मचारी आपल्या कुटुंबासह सहभागी झाले होते.

यावेळी सरकारी दुरवस्थेमुळे आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. एसटीचे शासनात विलीनीकरण नाही झाले तर पुढचा मोर्चा हा शरद पवार यांच्या घरावर काढण्यात येईल, असा इशारा यावेळी जाधव यांनी दिला.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मंगेश आजबे, आम आदमीचे संतोष नवलाखा, मनसेचे प्रदीप टापरे,प्रहार जनशक्तीचे जयसिंग उगले, भाजप युवा मोर्चाचे शरद कार्ले, वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी गाडे महाराज, सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार गाडे आदींनी पाठिंबा देऊन मनोगत व्यक्त केले.

एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला जामखेड तालुक्‍यातील तेलंगशी, रत्नापुर, धनेगाव, सोनेगाव, पाटोदा, लोणी, राजुरी, डोबेवाडी, नायगाव, जवळा, खांडवी, फक्राबाद आदी ग्रामपंचायतींनी ठराव घेऊन पाठिंबा दर्शवला. एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीचे निवेदन कर्मचाऱ्यांच्या विधवा पत्नींच्या हस्ते जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे यांना देण्यात आले.

जामखेडचे माजी उपसरपंच सुरेश जाधव, वंचित बहुजन आघाडीचे जामखेड तालुकाध्यक्ष आतिष पारवे, सोमनाथ भैलुमे, उपाध्यक्ष किशोर मोहिते, गणेश घायतडक, योगेश सदाफुले, शहराध्यक्ष अजिनाथ शिंदे, शहर उपाध्यक्ष सुधीर कदम,लोकधिकार आंदोलनाच्या

द्वारकाताई पवार, संतोष पवार, भैया जाधव, सखुबाई शिंदे, गणपत कराळे, वैशाली मुरूमकर, सचिन ससाणे, सुदाम शेगर, अरुण डोळस, विशाल जाधव, सचिन भिंगारदिवे आदी कार्यकर्त्यांनी मोर्चा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.