दुसऱ्या दिवशी बॅंकेचे व्यवहार ठप्प

कोट्यवधीची उलाढाल थांबली; ऑनलाईन व्यवहारावर भर

नगर  – बॅंक कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या द्विपक्षीय प्रलंबित करारा विरोधात युनाइटेड फोरम ऑफ बॅंक्‍स युनिअन्सने पुकारलेल्या संपाच्या दुसऱ्या दिवशी बॅंकेचे सर्व व्यवहार ठप्प राहिले. आज दुसऱ्या दिवशी भारतीय स्टेट बॅंकेच्या लालटाकी येथील शाखेसमोर बॅंक कर्मचाऱ्यांनी निर्देशने केली.यावेळी सरकार व आईबीएच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी कॉ.उल्हास देसाई, कॉ. माणिक अडाणे, कॉ.सुजित उदरभरे, कॉ.विकास निकाळजे, कॉ.सुनिल कुलकर्णी, कॉ.देशमुख आदिंसह बॅंक कर्मचारी व महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कॉ.उल्हास देसाई म्हणाले, जोपर्यंत आमच्या या मागण्यांचा सकारात्मक विचार केला गेला नाही तर पुढील महिन्यात जाहीर केल्याप्रमाणे दिनांक 11, 12, व 13 मार्च 2020 रोजी बॅंक कर्मचारी व अधिकारी पुन्हा एकदा रस्त्यावर येतील असा इशारा देण्यात आला. ते पुढे म्हणाले, बॅंक कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या वेतन वाढीची पूर्तता करण्यास असमर्थता व्यक्त करताना आईबीए बॅंक तोट्यात असल्याची सबब पुढे करीत आहे.

याला प्रत्युत्तर देताना नेत्यांनी स्पष्ट केले कि सरकार व आईबीएने बॅंकांच्या बेडीत व दुबईत कर्जदाराविषयी कडक धोरण अमलात आणावे, वसुलीसाठी कडक कायदे करावे, त्याची कडक कारवाई करावी, बॅंकांना विशेष अधिकार द्यावेत, तसेच बुडीत व दुबईत कर्जासाठी तरतूद किंवा राईट ऑफ ना करता अश्‍या कर्जदारांना गुन्हेगार घोषित करून त्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हे नोंदवण्यात यावेत कारण बॅंकांतील पैसे हा सर्वसाधारण कष्टकरी नोकरदार वर्गाचा कष्टाचा असून त्याची कामगार व अधिकारी संघटना कधीही लूट होऊ देणार नाही व त्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. कॉ. विकास निकाळजे बॅंक कर्मचारी व अधिकारी हे सुज्ञ असून जनतेच्या हितासाठी तसेच सुदृढ अर्थव्यवस्थेचा सदैव विचार करीत असतात.व ताबडतोब तोगड काढावा अन्यथा घोषित कार्यक्रम राबविण्यासाठी एकजुटीने तयार राहावे .

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.