मुंबई – गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला बिग बजेट फिल्म ‘तमाशा लाईव्ह’चा धमाकेदार टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. संजय जाधव दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटाचा टीझरमध्ये सुरुवातीला एका मुलीच्या आर्त किंकाळीने आणि त्यापाठोपाठ एक मुलगी उंच इमारतीवरून खाली पडताना दिसते.
View this post on Instagram
त्यानंतर अभिनेता सिद्धार्थ जाधव, त्या पाठोपाठ अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अभिनेता सचित पाटील स्क्रीनवर दिसत आहे. या टीझरमध्ये सोनाली कुलकर्णी आणि सचित पाटील बोलताना दिसत आहे की, ‘आता कोणत्या दगडाला शेंदूर फासणार?’ असा प्रश्नही ते विचारतांना दिसत आहे. या चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता वाढवणारा आहे. येत्या २४ जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
View this post on Instagram
या चित्रपटाची निर्मिती अक्षय बर्दापूरकर यांनी केली असून सौम्या विळेकर, डॅा. मनीषा किशोर तोलमारे, समीर विष्णू केळकर, अजय वासुदेव उपर्वात सहनिर्माते आहेत. संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटात मुख्य भूमिकेत सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, सचित पाटील, पुष्कर जोग, भरत जाधव, हेमांगी कवी, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे यांच्या भूमिका आहेत.