नवीन वर्षाच्या स्वागताला सिग्नलही जागणार

22 प्रमुख चौकांतील सिग्नल यंत्रणा रात्रभर सुरू राहणार

पुणे – गतवर्षाला निरोप देण्यासाठी तसेच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शहरात रात्री नागरिक साजरा करतात. त्यामुळे नागरिकांकडून चारचाकी तसेच दुचाकी वाहनांचा वापर रात्रभर केला जातो. त्यामुळे वाहतूक नियोजन तसेच सुरक्षेच्या अनुषंगाने प्रमुख 22 चौकांमधील सिग्नल यंत्रणा 31 डिसेंबरच्या रात्री आणि 1 जानेवारीला पहाटेपर्यंत सुरू ठेवणार आहे. त्यासाठी सिग्नलच्या वेळेत बदल करण्याचे पत्र वाहतूक पोलिसांकडून महापालिकेस नुकतेच दिले आहे. चौकाची यादीही पोलिसांकडून महापालिकेस दिली आहे.

शहरात 31 डिसेंबर रोजी गतवर्षाला निरोप देण्यासाठी तसेच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कार्यक्रम साजरे केले जातात. तसेच, कुटुंबासह नागरिक रात्रभर घराबाहेर पडतात. या दिवशी मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावर येतात. त्यामुळे काही प्रमुख रस्त्यांवर तसेच काही भागात रात्रीही वाहतूक कोंडी होते. वाहतूक पोलीस आणि पालिकेकडून दैनंदिन नियोजनासाठी प्रमुख चौकांतील वाहतूक सिग्नल रात्री 12 पर्यंत बंद केले जातात. त्यानंतर सकाळी 7 पासून पुन्हा यंत्रणा सुरू होईल, अशा प्रकारे टाईम सेट्‌ केला आहे. मात्र, नववर्षाला रस्त्यावर येणारी वाहने लक्षात घेऊन 1 जानेवारीला पहाटे 5 पर्यंत हे सर्व सिग्नल सुरू ठेवण्याचे पत्र पोलिसांनी दिले आहे.

या चौकातील सिग्नल रात्रभर जागणार
पुणे विद्यापीठ चौक, नळस्टॉप चौक, टिळक चौक, अलका चौक, पुरम चौक, मार्केटयार्ड चौक, सिंहगड जंक्‍शन, एबीसी फार्म, गोल्फ क्‍लब चौक, बोपोडी चौक, खंडोजीबाबा चौक, ज्ञानेश्‍वर पादुका चौक, सिमला ऑफीस चौक, शाहीर अमर शेख चौक, जेधे चौक, राजारामपूल चौक, फातीमानगर चौक, नेहरू मेमोरीयल चौक, शास्त्रीनगर चौक, सादलबाब चौक, गुडलक चौक, झाशीराणी चौक, जहांगीर चौक.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.