नवीन जीएसटी विवरणपत्र प्रणालीबाबत थेट व्यापाऱ्यांकडून अभिप्राय मागवणार

मुंबई – नवीन जीएसटी विवरणपत्र प्रणालीबाबत थेट व्यापाऱ्यांकडून अभिप्राय संकलित करण्यासाठी अर्थमंत्र्यांच्या पुढाकारानुसार केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाने (सीबीआयसी) मुंबईच्या सीजीएसटी विभागात 7 डिसेंबर 2019 रोजी नव्या जीएसटी विवरणपत्र प्रणालीसंदर्भात अभिप्राय दिवस आयोजित केला. नवीन विवरणपत्र व्यवस्था 1 एप्रिल 2020 पासून अंमलात येणार आहे.

सीजीएसटीच्या मुख्य आयुक्त संगीता शर्मा यांच्या नेतृत्वाखाली सीजीएसटी मुंबई विभागाने मुंबई शहर, उपनगर परिसर, नवी मुंबई आणि बोईसर, वसई यासारख्या दुर्गम ठिकाणी असलेल्या सुमारे 3 लाख करदाते असलेल्या 16 ठिकाणी अभिप्राय दिवस कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कर संबंधी कार्यक्रमाचे मूल्यमापन करण्यासाठी मुख्य आयुक्तांनी स्वतः या ठिकाणी भेट देऊन करदाते आणि विभागीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला. कर प्रशासन अधिक करदाते स्नेही बनविण्यासाठी आणि कर विवरण प्रणाली सोपे आणि पारदर्शक बनविण्यासाठी सरकारच्या धोरणाच्या अनुषंगाने हे आयोजन करण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.