सहा राज्यांमध्ये नवे राज्यपाल: तर दोन राज्यपालांची बदली

नवी दिल्ली- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी (२० जुलै) उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व पश्चिम बंगालसह एकूण सहा राज्यांचा राज्यपालांची नव्याने नियुक्ती केली आहे. मात्र, यापैकी दोन राज्यांतील राज्यपालांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये मध्य प्रदेशच्या विद्यमान राज्यपाल ‘आनंदीबेन पटेल’ व बिहारचे राज्यपाल ‘लालजी टंडन’ यांचा समावेश आहे.

मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे. तर, बिहारचे राज्यपाल लालजी टंडन यांना मध्य प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे. आणि पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी जगदीप धनखर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अगोदर राष्ट्रपतींनी १५ जुलै रोजी हिमाचल प्रदेश आणि गुजरातसाठी नव्या राज्यपालांची नियुक्ती केली होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)