नव्या शिक्षण समितीमुळे शालेय गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल – मारुती तुपे

हडपसर येथील भाजपचे नगरसेवक मारुती आबा तुपे यांची शिक्षण समितीच्या सदस्यपदी निवड

हडपसर – तीन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर नव्याने स्थापन झालेल्या महापालिकेच्या शिक्षण समितीत हडपसर भागाला चांगलेच झुकते माप मिळाले आहे. या समितीमुळे शाळा आणि विद्यार्थी यांची गुणवत्ता सुधारण्यास मोठी मदत होणार असल्याचा दावा, काही नवनिर्वाचित सदस्यांनी केला आहे.

हडपसर भागातील भाजपचे नगरसेवक मारुती आबा तुपे व शिवसेनेच्या नगरसेविका प्राची आल्हाट तसेच वानवडीतील भाजपच्या नगरसेविका कालिंदा पुंडे, कोरेगाव पार्क-घोरपडी येथील नगरसेविका लता धायरकर यांची या शिक्षण समितीत निवड झाली आहे. शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतर या विभागात कामकाजात काही प्रमाणात मरगळ आली होती.नव्या शिक्षण समिती आणि सदस्यांच्या निवडीने महापालिकेच्या शिक्षण विभागात कामाला गती मिळेल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.

आता शिक्षणात पूर्वीची अध्यापनपद्धती महत्त्वाची आहेच, परंतु त्याहीपेक्षा शिक्षणामध्ये आलेले नवीन विज्ञान आणि तंत्रज्ञानही महत्त्वाचे आहे. याशिवाय संगणकाची तसेच आता गेल्या काही वर्षांमध्ये आलेले अत्याधुनिक मोबाइल, फेस टू फेस शिक्षण आणि ई -लर्निंगचा जाणीवपूर्वक केलेला वापर, हे महत्त्वाचे वाटते. करोना काळात सुरू असलेले ऑनलाईन शिक्षण हेही लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे या शिक्षण समितीच्या माध्यमातून परिसरातील शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक यांच्यात गुणवत्ता पूर्वक बदलासाठी प्रयत्न केले जातील. शाळेच्या, शिक्षकांच्या आणि पालकांच्या अनेक मागण्या आहेत.त्या पूर्ततेसाठी आग्रही राहू.
– नगरसेवक मारुती आबा तुपे, सदस्य शिक्षण समिती.


पालिकेच्या शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल
या भागात अनेक शाळेच्या इमारती चांगल्या आहेत.तेथे ई- लर्निग सुरू करता येईल.8 पर्यंत असलेले वर्ग पुढे 10 वी पर्यंत वाढवून येथे सायन्स व संगणक लॅब तयार करता येतील. पालकांच्या मागणीनुसार काही मराठी माध्यम असलेली शाळा इंग्रजी माध्यम करण्यासाठी प्रयत्न केले जाईल. खासगी शाळेप्रमाणे किंबहुना अधिकच चांगल्या दर्जाचे शिक्षण पालिकेच्या शाळेत मिळेल यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहीन.
– नगरसेविका प्राची आल्हाट, सदस्या शिक्षण समिती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.