पहिल्या दिवसाची नवलाई !

गुलाबपुष्प आणि पाठ्यपुस्तक देऊन स्वागत
ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे आगमन
दोन महिन्यांच्या उन्हाळी सुट्‌टीनंतर शाळा सुरू
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

मावळ – दोन महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर शाळांमध्ये सोमवारी (दि. 17) किलबिलाट झाला. शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत केले. बहुतेक ठिकाणी ढोल-ताशांच्या गजरात गावातून प्रभातफेरी काढली. अनेक भागात विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांकडून “विशेष सेलिब्रेशन’ करण्यात आले.

रांगोळी, पताका, तोरणं, विविधरंगी फुगे फुलांची आकर्षक सजावट यांनी शाळांचे रुपडं बदलले दिसून आले. शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात पुस्तक दिंडी काढण्यात आली. मावळ तालुक्‍यात आंदर मावळ, नाणे मावळ, पवन मावळासह लोणावळा, वडगाव, कामेशत, कार्ला, तळेगाव दाभाडेसह देहूगाव परिसरात गणवेश वाटप, शालेय साहित्य वाटप शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरला.

कार्ला -एकवीरा विद्या मंदिर आणि प्राथमिक जिल्हा परिषदेच्या कार्ला शाळेत प्रवेश केलेल्या विद्यार्थांना गुलाबपुष्प व पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थांना पाठ्यपुस्तक देऊन स्वागत करण्यात आला. त्याचबरोबर एकवीरा विद्या मंदिर व श्रीमती लाजवंती हंसराज गुप्ता ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थांना कै. पार्वताबाई गणपत हुलावळे आणि कै. गणेश विश्‍वनाथ हुलावळे यांच्या स्मरणार्थ विशेष पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी माजी सभापती शरदराव हुलावळे, सरंपच अश्‍विनी हुलावळे, उपसरपंच अविनाश हुलावळे, सदस्या रुपाली हुलावळे, ग्रामसेवक श्रीधर नाईकडे, मुख्यध्यापक शहाजी लाखे, नंदा गरड, तुकाराम हुलावळे, अनंता हुलावळे, संतोष हुलावळे, सागर हुलावळे, दादा फाकटकर, सचिन हुलावळे, शैलेश चव्हाण, उमेश इंगूळकर, बाबाजी हुलावळे, दिलीप पोटे, प्रवीण राऊत, वरुण दंडेल व शिक्षक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.