शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेण्याची आवश्यकता

नवी दिल्ली- केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनाला 26 नोव्हेंबर रोजी सुरुवात झाली असून, आज या आंदोलनाचा १३ वा दिवस आहे. आंदोलना दरम्यान केंद्र सरकारसोबत शेतकऱ्यांची पाच वेळा बैठक झाली. मात्र, अद्यापही तोडगा निघाला नाही. त्यामुळे शेतकरी सध्या दिल्ली सीमेवर ठिय्या मांडून आहेत. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आज ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. शेतकऱ्यांच्या या भारत बंदला अनेक शेतकरी संघटनांनी विरोध केला आहे. देशातील सामान्यांपासून ते  सिनेकलाकार, राजकीय नेते अनेकांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

यातच आता या आंदोलनाला बॉलीवुड अभिनेता प्रकाश राज यांनी प्रकाश राज यांनी या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. ते म्हणाले की, ‘शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेण्याची आवश्यकता आहे. मी भारत बंदला पाठिंबा  देत आहे,  तुम्ही सुद्धा या आंदोलनाला पाठींबा  देत आहात ना  ?  अस म्हणत त्यांनी सर्व सामान्य नागरिकांना शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला समर्थन करण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान,  पंजाबी कलाकार असो वा बॉलिवूड कलाकार सर्वच जण शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. अभिनेता रितेश देशमुख, अभिनेत्री सोनम कपूर, दिग्दर्शक हंसला मेहता, दिलजीत दोसांज, सनी देओल, प्रियांका चोप्रा, प्रति झिंटा, या सर्वांनीच सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करत आंदोलनावर भाष्य केलं आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.