नगर (प्रतिनिधी) – करोना हा संसर्गित असल्याने झपाट्याने शहरात वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. करोनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. तसेच शासनाने घातलेल्या अटी शर्तीचे व नियमांचे पालन प्रत्येक नागरिकांनी करावे असे आवाहन राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष संतोष ढाकणे यांनी केले.
माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त तपोवन परिसरात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शहर सचिव तन्वीर मणियार यांच्या वतीने सॅनीटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी शहरजिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे, सज्जाद बागवान, तुषार हंगे आदीसह नागरिक उपस्थित होते.
वैभव ढाकणे म्हणाले की, करोना संसर्ग विषाणूचा नायनाट करण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे. जगताप कुटुंब नेहमीच शहरावर आलेल्या संकटाच्या काळामध्ये नागरिकांना आधार देण्यासाठी उभे असते, आ. संग्राम जगताप यांनी लॉकडाऊनच्या काळामध्ये गरजूंना अन्न धान्य वाटप केले.