नाशिक -पुढील काळात किमान जमिनीवर अधिक क्षेत्रफळ निर्माण करण्याची आवश्यकता राहणार आहे. यामध्ये आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची असून ग्रीन बिल्डिंगची संकल्पना अधिकाधिक राबविण्यासाठी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व शिक्षणाची देण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
नाशिकमधील विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ व अन्य उपस्थित होते.
पवार म्हणाले, शैक्षणिकदृष्ट्या समाजाला सक्षम करण्यासाठी शासनामार्फत वर्षाला 65 हजार कोटी रुपये अनुदान शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षण आणि इतर कर्मचाऱ्यांवर खर्च केला जात आहे. तसेच शिक्षण घेण्याचा हक्क समाजातील प्रत्येक व्यक्तीला असल्याने शासन नेहमी शिक्षणाला प्राधान्य देते आहे. त्यामुळे मविप्र संस्थेच्या विविध उपक्रमाला पाच कोटीची मदत जाहीर करत असून गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण देऊन शैक्षणिक वारसा पुढे नेण्याचे मविप्रपणे करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
मराठा विद्या प्रसारक समाज शैक्षणिक संस्थेला शतकांचा इतिहास आहे. यामुळे या संस्थेच्या रचलेल्या पायाला अधिक भक्कपणे पुढे नेण्यासाठी संस्थेमार्फत सुरु करण्यात आलेल्या आर्किटेक्चर व पॉलिटेक्निकल महाविद्यालयात आधुनिक काळाची आणि उद्योगांची गरज लक्षात घेऊन आधुनिक शिक्षण पद्धतीची कास धरावी, असेही ते म्हणाले.