जामखेड (प्रतिनिधी) – जामखेड तालुक्यातील जवळके येथे दोन व्यक्ती कोरोना बाधीत आढळून आल्या असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना ग्राम सुरक्षा समितीसह प्रशासकीय यंत्रणेची आढावा बैठक जवळके गावात शनिवार रोजी पार पडली. असून सात जुलै पर्यंत जवळके गाव प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून गावात बाहेरील व्यक्तींना प्रवेश बंद करण्यात आला आहे.
मुंबईला सासर्याला भेटायला गेलेल्या जामखेड तालुक्यातील जवळके येथील एका तीस वर्षीय व्यक्तीला कोरोणाची नुकतीच लागण झाली असून त्याचा रिपोर्ट दि. २४ जून रोजी पॉझिटिव्ह आला यामुळे जामखेड तालुक्यात खळबळ उडाली असून जामखेड तालुक्यात पुन्हा कोरोणाने शीरकाव केल्याने प्रशासनासह नागरिकांचे धाबे दणाणले असून संबंधित व्यक्तीच्या संपर्कातील सात नातेवाईकांना नगर येथे हलविण्यात आले होते.
या सात नातेवाईकांपैकी 50 वर्षीय एका महिलेचा स्वॅब शुक्रवारी पॉझिटिव्ह आल्याने जवळके गावची कोरोना बाधितांची संख्या दोनवर पोहोचली असून या महिलेच्या संपर्कातील चार व्यक्तींना शुक्रवार रात्री जामखेड येथील आरोळे हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून शनिवाार रोजी गटविकास अधिकारी कोकणी पी पी, यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना ग्रामसुरक्षा समितीसह प्रशासकीय यंत्रणेची बैठक पार पडली.
यावेळी विस्तार अधिकारी माने ,सरपंच संतोष वाळुंजकर, माजी सरपंच कांतीलाल वाळुंजकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल चव्हाण , बाबासाहेब तागड ,पोलीस पाटील विक्रम डमरे चेअरमन पृथ्वीराज वाळुंजकर ,बब्रुवान वाळुंजकर , ग्रामसेविका जयश्री मोहळकर यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते .
या बैठकीत संपूर्ण गाव निर्जंतुकीरण करण्याच्या सुचना देण्यात आल्या असून अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण व्यवहार बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून आरोग्य विभागा मार्फत सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले असून जवळके गाव 7 जुलै पर्यंत प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून गावात बाहेरील व्यक्तीला प्रवेश बंद करण्यात आला आहे.