पुणे : राज्यसभेत खासदार उदयनराजे भोसले यांच्या शपथविधीनंतर राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केलेल्या विधानाचा निषेध म्हणून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे राज्यसभा अध्यक्ष नायडू यांना गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाच्या प्रती सप्रेम भेट पाठवण्यात आल्या.
याबरोबरच ‘जय भवानी,जय शिवाजी’ या घोषणा लिहून पोस्ट कार्डस ही पाठवण्यात आले आहेत. तसेच या घटनेबद्दल नायडूंनी जनतेची माफी मागावी.’ अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राकेश कामठे यांनी केली. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष महेश हांडे, वृक्ष प्राधिकरण सदस्य मनोज पाचपुते, निखिल बटवाल, शिवाजीनगर अध्यक्ष अविनाश भांड, निशिकांत कांबळे ,कार्तिक थोटे,योगेश घोलप ,ऍलन केदारी शेखर मौर्या ,अक्षय भांड , ऍशली अँथनी ,प्रथमेश गाडे ,सुमीत गोपती ऋषिकेश भंडारी यावेळी उपस्थित होते.