नवी दिल्ली – दहशतवादी, गॅंगस्टर्स आणि अंमलीपदार्थांचे तस्कर यांच्यातील वाढत्या जवळिकींचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मंगळवारी पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये सुमारे 50 ठिकाणी छापे टाकले. ( NIA carries out raids in Punjab, Haryana, UP ) यावेळी काही प्रभावशाली गुंडांच्या निवासस्थानांवरही छापेमारी करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
या छाप्यांमध्ये ड्रग्ज, रोख रक्कम, गुन्ह्याची कागदपत्रे, डिजिटल उपकरणे, बेनामी मालमत्तेचा तपशील आणि धमकीची पत्रे याशिवाय दारूगोळ्यासह सहा पिस्तूल, एक रिव्हॉल्व्हर आणि एक शॉटगन अशी सामग्री जप्त करण्यात आली आहे.
Bharat Jodo Yatra : कॉंग्रेस खासदाराचे राहुल यांना आवाहन, म्हणाले “भारत जोडो यात्रा थांबवा आणि…”
भारतातून पळून गेलेले टोळीचे अनेक म्होरके आणि त्यांचे हस्तक सध्या पाकिस्तान, कॅनडा, मलेशिया आणि ऑस्ट्रेलियासह अन्य देशांतून कार्यरत आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांच्या भारतातील हस्तकांची आणि त्यांच्या कारवायांची सबळ माहिती मिळाल्यानंतर ही छापेमारी करण्यात आली आहे.